सामुदायिक विवाह सोहळ्यात जुळल्या 16 रेशीमगाठी

पिंपरी – लग्न घटीका साधण्यासाठी वधु-वरांची सुरु असलेली लगबग…, उत्साही वऱ्हाडी मंडळी…, मान्यवरांची जंत्री…, असा उत्साहपूर्ण आणि मांगल्याने भारावलेल्या वातावरणात चिखलीत सोळा जोडप्यांची विधीवत लग्नगाठ बांधली गेली. निमित्त होते नगरसेवक राहुलदादा जाधव स्पोर्टस्‌ फाउंडेशनतर्फे नगरसेवक राहुल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत सर्वजातीधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे.

जाधववाडीतील रामायण मैदानावर सर्वजातीधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रामायण मैदान विवाहासाठी आकर्षक पध्दतीने सजवण्यात आले होते. वऱ्हाडी मंडळींच्या उत्साहामुळे अख्खा चिखली परिसर लग्नसोहळ्याच्या आनंदात न्हाला होता. गरीबीमुळे विशेषत: मुलींना विवाहात हौसमौज करता येत नाही. याचमुळे साखरपुडा, हळद असे सर्व विधी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यानंतर विधीवत लग्न लावण्यात आले.

जलसंधारणमंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे, राज्य सभेचे खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड, महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार तसेच नगरसेवक, नगरसेविका विविध पक्षांचे पदाधिकारी, संस्था, संघटनांचे पदाधिकारी या सोहळ्याला उपस्थित होते. आमदार महेश लांडगे यांनी स्वागत केले. राम शिंदे, अमर साबळे यांनी वधु-वरांना वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा देत सामुदायिक लग्न सोहळे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. लग्न झालेल्या जोडप्यांना नवीन संसाराला हातभार म्हणून आयोजकांतर्फे संसारोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. दत्त दिगंबर नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षा मंगल जाधव यांनी संयोजनात पुढाकार घेतला. आभार नगरसेवक राहुल जाधव यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)