धुळे: सामाजिक व धार्मिक एकोपा राखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी मतभेद दूर सारून एकत्र यावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि माज केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले आहे. ते धुळे येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. धुळे एक कॉस्मोपॉलिटन शहर असल्याने याची सुरुवात येथूनच होऊ शकते, असेही ते यावेळी म्हणाले.
शरद पवार म्हणाले, धुळेसुद्धा एक कॉस्मपॉलिटन शहर आहे. सामाजिक तसेच धार्मिक एकोपा नांदवण्यासाठी सगळे भेद दूर सारून एकत्र येण्याची सुरवात धुळेसारख्या शहरातून होऊ शकते. मी सगळ्या राजकीय मंडळींना एकत्र येण्याचे आव्हान करतो.
तसेच धुळे हे तीन राष्ट्रीय महामार्गावर असलेले भारतातील एक मध्यवर्ती ठिकाण आहे. त्याचा फायदा धुळे शहर व जिल्ह्यासाठी कसा होईल, काही ध्येय-धोरणे, योजना आखता येतील का, यासाठी सर्वपक्षीय एकत्र याव. माझा शब्द कुठे टाकायचा असल्यास मी त्यासाठी सदैव तयार आहे, असे त्यांनी सांगितले.
धुळे शहराने महात्मा गांधी, पंडितजी नेहरू, वि. दा. सावरकर, यंशवंतराव चव्हाण या थोर नेत्यांना मानपत्र देऊन सन्मानित केले आहे. त्याच धुळ्याच्या महापालिकेने आज मला मानपत्र देऊन सन्मानित केले. त्यामुळे मी धुळेकरांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो, अशा शब्दांत शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)