बेल्हे- सार्वजनिक गणेश मंडळांनी हुल्लडबाजी न करता सामाजिक बांधिलकी जपत पारंपारीक वाद्यांच्या गजरात गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी दिपाली खन्ना यांनी केले. आळेफाटा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गणेशोत्सव व मोहरम सणानिमीत्त राजुरी (ता. जुन्नर) ग्रामपंचायत कार्यालयात शांतता कमेटीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश उगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती ढमाले, पंचायत समीतीचे माजी सभापती दीपक औटी, सरपंच संजय गवळी, माऊली शेळके, उपसरपंच चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते. दीपाली खन्ना यांनी सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना डी. जे व गुलाल न वापरता उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)