सामाजिक बांधिलकीतून नेत्रतपासणी शिबिर

कोपरगाव – गरिबी, कामाचा व्याप यामुळे दिवसेंदिवस मनुष्याचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. याकडे लक्ष वेधून सामाजिक बांधिलकीतून नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन केल्याचे संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे म्हणाले.
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या 89 व्या वाढदिवसानिमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठान, नीलवसंत मेडिकल व रिसर्च फाउंडेशन, मणिशंकर आय हॉस्पिटलच्या वतीने मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिर झाले. सोपान पानगव्हाणे, निवृत्ती बनकर, अशोक भाकरे, कैलास माळी, चांगदेव कंक्राळे, मच्छिंद्र लामखडे, संदीप कदम यावेळी उपस्थित होते.
कोल्हे म्हणाले, “”माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी समाजाच्या विकासासाठी शेकडो योजना राबवल्या. कोपरगाव मतदारसंघाच्या विकासात त्यांनी मोठी भर घातली आहे. गोरगरीब, वंचित, अल्पसंख्याक, मागासवर्गीय घटकांसाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध आरोग्य सुविधा दिल्या आहेत. पाच वर्षांत 7 हजार रुग्णांची तपासणी करून 3 हजार रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. गरजू रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. आजारांच्या उपचारासाठी शासनाच्या असंख्य योजना आहेत, पण त्या वंचितांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यासाठी संजीवनी मदत केंद्र तसेच इफको (नवी दिल्ली) या संस्थांच्या माध्यमातून शेकडो रुग्णांना मदतीचे काम अव्याहतपणे सुरू आहे.”
शिवाजी कदम, सखाहरी उगले, माहेगाव देशमुखचे सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, माजी सभापती सुनील देवकर, अंबादास देवकर, बाळासाहेब निमसे, नामदेव घायतडक, शशिकांत सोनवणे, डॉ. शुभांगी राठी, डॉ. निकिता शहा, डॉ. नवनाथ घोलप, कुणाल जगदाळे, प्रमोद चव्हाण, महेंद्र चौधरी, सविता तांदळे, दीपक जाधव, स्नेहल ठाकरे, मोहिनी गायकवाड यावेळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)