सामाजिक बहिष्काराचे सर्वाधिक गुन्हे पुण्यात

राज्यात आठ महिन्यात वीस गुन्हे: सहा गुन्ह पुणे जिल्ह्यात
पुणे – आंतरजातीय विवाह किंवा अन्य कारणाने जातपंचायतीने बहिष्कृत करणाऱ्या जातपंचायतीविरोधात सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यांतर्गत आतापर्यंत 20 गुन्हे दाखल झाले असून त्यातील 6 गुन्हे हे पुणे जिल्ह्यातील असल्याची माहिती अंधश्रध्दा निर्मूलन समितीकडून देण्यात आली आहे. या 20 पैकी 18 गुन्ह्यांबाबत अंनिसने पाठपुरावा केला असल्याची माहितीही समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली.
अंधश्रध्दा निर्मूलन समितीकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील यांनी ही माहिती दिली. पाटील म्हणाले, अंधश्रध्दा निर्मूलन समितीने पाठपुरावा केल्यानंतर राज्य शासनाने सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा आणला. याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 3 जुलै 2017 पासून सुरु झाली. या आठ महिन्यांच्या कालावधीत राज्यात 20 गुन्हे या कायद्यांतर्गत दाखल झाले. यातील बहुतांशी गुन्हे हे आंतरजातीय विवाह केल्याने समाजाने बहिष्कृत केलेल्यांचे होते. त्यापैकी 18 गुन्ह्यांबाबत अंनिसने पाठपुरावा केला तर या 20 गुन्ह्यांपैकी विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात घडले आहेत. पाटील पुढे म्हणाले, आजही अनेक गावांमधील लोकांना असा काही कायदा अस्तित्त्वात आहे याची माहिती नाही. त्यामुळेच अनेक कुटुंब या समाजिक बहिष्कृततेला बळी पडतात.

सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याच्या स्वागत परिषदेचे आयोजन
सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा येऊन त्याची अंमलबजावणी सुरु झाली असून महाराष्ट्रातील नागरिकांना याची हळूहळू माहिती होत आहे. याचा अधिक प्रसार व प्रचार व्हावा या दृष्टीकोनातून अंधश्रध्दा निर्मूलन समिती व यशवंराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्‍त विद्यमाने कायद्याच्या स्वागत परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद 7 एप्रिल रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मुंबईतील यशवंतराच चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे. या परिषदेला विधानपरिषदेचे सभापती राजराजे निंबाळकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार सुप्रिया सुळे, आमदार निलम गोऱ्हे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्षमीकांत देखमुख आदी उपस्थित रहाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)