सामाजिक न्याय भवनासाठी ना. बडोलेंशी चर्चा करणार – ना. रामदास आठवले यांची ग्वाही

दै. प्रभातच्या वृत्तमालिकेची गांभीर्याने दखल

सातारा, दि.22 (प्रतिनिधी)- येथील सामाजिक न्याय भवनचे उदघाटन तात्काळ व्हावे, यासाठी मुंबईला जाताच ना. राजकुमार बडोले यांच्याशी चर्चा करणार असल्याची ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

सातारा दौऱ्यावर गुरुवारी आलेले ना. आठवले यांच्या आयोजित पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच साताऱ्यातील सामाजिक न्याय भवनाचे उद्‌घाटन प्रलंबित असून त्याबाबत नुकतीच दैनिक प्रभातने ‘उपेक्षित सामाजिक न्याय भवन’ शिर्षकाखाली प्रसिद्ध केलेली लेखमालिकेची माहिती देण्यात आली. ना. आठवले यांनी लेखमालिकेचे वाचन केल्यानंतर मुंबईला जाताच राज्य सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर उदघाटन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. त्याचबरोबर साताऱ्यात महामाता भिमाई यांच्या स्मारक पूर्णतत्वासाठी प्रयत्नशील राहणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साताऱ्यातील निवासस्थान आणि शाळाप्रवेश दिनानिमित्त केलेल्या घोषणांच्या अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांना सूचना देणार असल्याचे ना. आठवले यांनी सांगितले. अण्णा वायदंडे, अशोक गायकवाड, शरद गायकवाड, दादासाहेब ओव्हाळ, अप्पा तुपे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

बांधकाम विभागाने दिली माहिती
दरम्यान, न्याय भवनाचा विषय ना. आठवले यांच्यासमोर येणार त्यादृष्टीने सार्व. बांधकाम विभागाचे अधिकारी विश्रामगृहावर दाखल झाले. त्यांनी परिसरातील अतिक्रमणे काढण्याविषयी वारंवार केलेला पाठपुरावा आणि समाज कल्याण विभागाकडून प्रतिसाद न मिळाल्याने उदघाटन रखडले असल्याची माहिती यावेळी सादर केली. त्यामुळे येत्या काही दिवसात संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार हे स्पष्ट झाले.

 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)