सामाजिक न्यायाच्या पायावरच लोकशाही उभी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे- सामाजिक न्याय म्हणजे केवळ संपत्तीचे समान वाटप नव्हे. तर, स्वातंत्र्य, समता, बंधूता या मूल्यांवर आधारित समाजाची निर्मिती हा सामाजिक न्यायाचा भाग आहे. सामाजिक न्यायाच्या पायावरच लोकशाही उभी आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्‍त केले. भारती विद्यापीठाचे संस्थापक – कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भारती विद्यापीठ व भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या वतीने डॉ. पतंगराव कदम प्रबोधन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अजय खानविलकर, मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश नरेश पाटील, विद्यापीठाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, कार्यवाह व प्र – कुलगुरू डॉ. विश्वजित कदम आणि प्राचार्य डॉ. मुकूंद सारडा आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, तळागाळातील माणसाला विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्याच्या उद्देशाने विधी मंडळाने धोरणे आखली, तर न्यायालयाने लोकशाहीचे संरक्षक म्हणून काम केले आहे. सर्वसामान्यांना जलदगतीने न्याय मिळावा, यासाठी लवाद आणि विविध न्यायालये स्थापन करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने भर दिला आहे. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राचेही योगदान राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली.
नरेश पाटील म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्व नेते कायद्याचे पदवीधर होते. त्यांनी वैयक्‍तिक अपेक्षांच्या पलीकडे जाऊन देश उभारणीसाठी प्रयत्न केले, अशा ध्येयाने भारलेल्या तरुणांची आज देशाला गरज आहे. अजय खानविलकर म्हणाले, सामान्य माणसेच राष्ट्र निर्माण करतात. सामान्य माणसांना असामान्य काम करता येईल, असे वातावरण निर्माण करणे महत्त्वाचे आहे. यावेळी डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. विश्‍वजीत कदम, प्रार्चाय डॉ. मुकुंद सारडा यांनी मनोगत व्यक्‍त केले.

Remarks :


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)