सामाजिक कार्याबद्दल वैभव पोरे यांचा सत्कार

पुणे : खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारताना वैभव पोरे.

बिजवडी, दि. 2 (वार्ताहर) – सामाजिक कार्यकर्ते वैभव पोरे यांना सामाजिक कार्याबद्दल खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासनाना देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, सुरज मांढरे, शिक्षणाधिकारी कुऱ्हाडे, जि. प. सदस्य व मान्यवरांच्या उपस्थित पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. वैभव पोरे हे म्हसवडचे रहिवाशी असून ते सध्या पुणे जिल्हयातील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करत आहेत. शाळांसाठी उत्कृष्ट लोकसहभाग, सीएसआरच्या माध्यमातून मदत कार्य याद्वारे शाळांची उन्नती व गुणवत्ता विकास कामातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)