सामाजिक उत्तर दायित्त्वासाठी नेहमी कटिबद्ध : कंदी

काळगाव – समाजातील वंचितापर्यंत पोहचण्यासाठी सी. एस. आर. चे उद्योग समुहांच्या आस्थापनाजवळच प्रकल्प हाती घेण्याचे धोरण असते. जिथे मदत पोहचत नाही. उद्योगधंदे नाहीत, रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. आरोग्याच्या, शिक्षणाच्या सुविधा नाहीत. अशा ठिकाणी प्रकल्प हाती घेतल्यास त्याचा समाजाला फायदा होईल. कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यानी ग्रामीण, दुर्गम भागात जाऊन शैक्षणिक सुविधा निर्माण कराव्यात.

सामाजिक उत्तर दायित्वासाठी जी. ई. कंपनी सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जी. ई. इंडिया कंपनीचे एच. आर. हेड. सीताराम कंदी यांनी केले. जी. ई. इंडिया कंपनीच्या सी. एस. आर. फंडातून कोयना शिक्षण संस्थेच्या न्यू. इंग्लिश स्कूल बेलवडे खुर्द विद्यालयाच्या इमारत भूमिपूजन समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.सोपानराव चव्हाण होते. यावेळी संजय मुंदडे, दिपांजली मुंदडे, शिवाजी चव्हाण, संतोष मोरे उपस्थित होते.

कोयना शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी अमरसिंह पाटणकर, हणमंतराव जाधव, दादासाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. संजय मुंदडे म्हणाले, विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पहावीत व सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करावेत. शाळांनी संख्यात्मक वाढीबरोबर गुणात्मक वाढ करावी. प्रास्ताविक मुख्याध्यापिका विजया नांगरे यांनी केले. स्वागत तानाजी खाडे यांनी सुञसंचालन सुनिता कदम यांनी केले. आभार अमृत चव्हाण यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)