सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोदींचे योगदान काय?

मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांचा सवाल


मोदींना पदवीदान समारंभाला निमंत्रण देण्यास विरोध

मुंबई – मुंबई आयआयटी संस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदाच्या पदवीदान सोहोळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले पण त्या संस्थेतील काही विद्यार्थ्यांनी मोदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होण्याला आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी त्यासंबंधात एक निवेदन जारी करून मोदींना आपला विरोधही नोंदवला आहे.

मोदींना हे निमंत्रण देऊन येथे बोलावण्याची काय गरज होती असा सवाल त्यांनी संस्थेच्या प्रशासनाला विचारला आहे. मोदींचे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रासाठीचे योगदान काय असा सवालही या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. सामाजिक सलोखा आणि नागरीकांच्या मुलभूत हक्कांच्या संबंधात त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशात नेमके काय केले आहे असा प्रश्‍नही या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

-Ads-

आपल्यावर कारवाई होईल या भीतीने या विद्यार्थ्यांनी या निवेदनावर आपली नावे जाहीर केलेली नाहीत. मोदींच्या येथील कार्यक्रमाच्यावेळी त्यांच्या भाषणात अडथळे आणले जाणार नाहीत असे या विद्यार्थ्यांनी स्पष्ट करतानाच मोदींच्या कारभारावरही सडकून टीका केली आहे. मोदी सरकारने उच्च शिक्षण क्षेत्रासाठीच्या निधीमध्ये मोठी कपात करून सर्वांना शिक्षण या संकल्पनेलाच तडाखा देण्याचा प्रयत्न केला आहे.

शिक्षण किंवा उच्च शिक्षण हे केवळ मोजक्‍याच लोकांना मिळावे अशा ब्राम्हणी संकल्पनेतून हे सरकार काम करीत असल्याची टीकाही या विद्यार्थ्यांनी केली आहे. सरकारने शिक्षण क्षेत्रासाठी असलेल्या निधीत मोठी कपात केल्याने अनेक विद्यापीठांना फी वाढ करून आपले उपक्रम टिकवून ठेवावे लागले आहेत. विद्यार्थ्यांच्या मदतसीठीच्या अनेक स्कॉलरशिप आणि फेलोशिप बंद ठेवण्यात आल्या आहेत.

सध्या कार्यरत असलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या जागेवर उच्चशिक्षण समिती स्थापन करून विद्यापीठ अनुदान आयोग कायमचा बंद करण्याचा घाट मोदी सरकारने घातला असून त्यांच्या या मनमानीलाहीं या विद्यार्थ्यांचा विरोध आहे. मोदींना जेव्हा आयआयटी सारख्या उच्च शिक्षण संस्थांच्या पदवीदान समारंभासाठी पाचारण केले जाते त्यावेळी त्यांना आम्ही काही प्रश्‍न विचारणे गैर आहे काय असा सवालही या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

मोदी सरकार देशातील शिक्षण संस्थांवर घाला का घालत आहे असा त्यांचा मुख्य सवाल आहे. दलित आणि मुस्लिमांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत सरकारकडून होणाऱ्या निष्क्रीयतेच्या संबंधातही या विद्यार्थ्यांनी मोदी सरकारला सवाल केले आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)