सामाईक बांधाच्या हद्दीवरून वाद

चौघांविरूद्ध गुन्हा दाखल
अकोले – तालुक्‍यातील सुगांव बु।। येथील शेतीजमिनीच्या बांधाच्या हद्दीवरून झालेल्या वादात लक्ष्मण सुखराम देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूद्ध अकोले पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत माहिती अशी की, लक्ष्मण व नवनाथ देशमुख यांच्यामध्ये सामाईक बांधाच्या हद्दीवरून वाद होते. म्हणून सन 2013 मध्ये पोलीस पाटील व गावातील काही प्रतिष्ठीतांच्या मध्यस्थीने मौजे सुगांव बु।। येथील स.नं. 118 मध्ये दोघांच्या सामाईक बांधाच्या हद्दीच्या खाजगी मोजणी करून खुणा पोलने दाखविण्यात आल्या होत्या. त्या आम्हा दोघांना मान्य होत्या. परंतु एक महिन्यापूर्वी नवनाथ देशमुख त्यांची पत्नी व मुलांनी सदरच्या खुणाचे पोल उपटून फेकून दिले.
दि. 18 मे रोजी दुपारी 5.30 चे सुमारांस सामाईक बांधावरून सिमेंट पोल रोवण्यासाठी लक्ष्मण देशमुख तसेच सुनिल देशमुख, भास्कर भांगरे, आबासाहेब देशमुख, बाळासाहेब देशमुख, लिलाबाई देशमुख, अनिल देशमुख, योगेश देशमुख हे देखील हजर होते. तेव्हा मी गावातील मान्यवरांशी चर्चा करत असतांना नवनाथ भाऊसाहेब देशमुख हा त्यांच्या घराकडे पळत गेला व त्याने घरातून लाकडी काठी आणली. मला हे मान्य नाही, तुम्ही फार माजले आहात. तुमच्याकडे पहातो अशी दमदाटी करू लागला. त्यावेळी लिलाबाई, अनिल व योगेश हे आमच्या शेतामध्ये धावत आले. नवनाथ याने हातातील काठीने मला मारहाण केली. यामध्ये माझ्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर जखम झाली. ग्रामस्थांनी आमचा वाद सोडविला. तरीही लिलाबाईने भरत यास ढेकळे फेकुन मारले. तर अनिल, योगेश यांनी आम्हा दोघांना खाली पाडून लाथाबुक्‍याने मारले. अश्‍लील शिवीगाळ केली.
या प्रकरणी लक्ष्मण सुखराम देशमुख यांनी अकोले पोलीसांत दिलेल्या लेखी तक्रारीवरून अकोले पोलीसांनी नवनाथ भाऊसाहेब देशमुख, लिलाबाई भाऊसाहेब देशमुख, अनिल नवनाथ देशमुख व योगेश नवनाथ देशमुख या चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी लक्ष्मण सुखराम देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना अनिल नवनाथ देशमुख हा माणूस अतिशय आडदांड प्रवृत्तीचा असून, त्याने सन 2012 मध्ये अशाच पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैल कामगारांना देखील गाजरीच्या ओहोळात बाचाबाची केली होती, याची आठवण करून दिली. याप्रकरणी समझोता पत्र करून सदरचा वाद मिटविण्यात आला होता असेही त्यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)