सामर्थ्यवान होण्यापेक्षा निरोगी असणे गरजेचे!

पिंपरी – माणसाने सामर्थ्यवान होण्यासाठी आधी निरोगी असणे गरजेचे आहे. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी जे काही करता येईल, ते केले पाहिजे. निरोगी व्यक्ती केवळ ताकदीनेच नव्हे; तर आर्थिकदृष्ट्याही सामर्थ्यवान बनतो, असे मत भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले.

राज्य शासनाचा आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि प्रतिभा महिला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सांगवीतील पीडब्ल्युडी मैदानावर गरजू व गोरगरीब रुग्णांसाठी आयोजित तीन दिवसीय मोफत अटल महाआरोग्य शिबिराचे उद्‌घाटन आमदार जगताप यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी सचिव ओमप्रकाश शेटे, प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका अश्विनी जगताप, अभिनेत्री भार्गवी चिरमुले, तेजा देवकर, उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेविका सीमा सावळे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डॉ. जयश्री तोडकर म्हणाल्या, जागतिक आरोग्य संघटनेने लहान मुलांच्या लठ्ठपणात भारत जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश असल्याचे म्हटले आहे. ही आपल्यासाठी चांगली गोष्ट नाही. जीवनशैली बदललेली असली, तरी जेवण शैली आहे तशीच आहे. ताव मारा अशीच बनली आहे. जीवनशैली म्हणजे जास्तीत जास्त बैठे काम आणि आरामदायी बनले आहे. त्यामुळे खाल्लेले अन्न साचून विष बनून भिनते आहे. 30 वर्षाखाली हृदयाचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. जंकफूट खाणार नाही, दिवसांतून एक दिवस मैदानावर घालवणार, असा ठाम निर्णय घेतला पाहिजे. अन्यथा आपली पुढची पिढी आपल्या आधी संपल्याचे बघायला लागू शकते, अशी भिती त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश शेटे आणि अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात स्वच्छतेचा संदेश देत पिंपळे गुरव ते कन्याकुमारीपर्यंत सायकलने प्रवास करणारे माऊली जगताप, विशाल कदम, राहुल कुडाळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सीमा सावळे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)