सामन्य माणसांच्या इच्छाशक्तीमुळेच देशात बदल – ओबामा

शिकागो – बराक ओबामा यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून शिकागो येथे आपले निरोपाचे भाषण केले. यावेळी त्यांनी अमेरिकन लोकशाहीच्या परंपरेची जोरदार पाठराखण केली. देशामध्ये अमूलाग्र बदल घडवायचा असेल, तर सामन्यातल्या सामन्य माणसाची इच्छशक्ती असणे गरजेचे असल्याचे ओबामांनी यावेळी म्हटले आहे. गेल्या आठ वर्षात केलेल्या चांगल्या कामांची जंत्री त्यांनी लोकांसमोर मांडली. तसेच उपस्थितांनी त्याला भरभरून दाद दिली.

ओबामा सलग आठ वर्ष जगातल्या सुपर पावरच्या सर्वोच्च पदावर कार्यरत आहेत. पुढच्या आठवड्यात नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेणार आहेत. यापूर्वी ओबामांच अध्यक्षीय भाषण झाले. हे भाषण शिकागोतून सर्वत्र लाईव्ह प्रसारित झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)