सामना बरोबरीत सुटला हे आमचे भाग्यच – विराट कोहली

वेस्ट इंडीजच्या खेळाडूंवर उधळली स्तुतीसुमने

विशाखापट्टणम: वेस्ट इंडीजच्या संघातील खेळाडूंनी काल उत्तम क्रिकेट खेळले. त्यामुळे हा सामना बरोबरीत संपला’ हे आमचे भाग्यच समजावे लागेल असे महणत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या प्रतिस्पर्धी संघाचे कौतुक केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील यांच्यात सुरू असलेल्या एअकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना बुधवारी विशाखापट्टणम येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 बाद 321 धावांची मजल मारताना वेस्ट इंडीजसमोर विजयासाठी 322 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य विंडीजला पार पाडता आले नाही, मात्र त्यांनी 50 षटकांत 8 गडी गमावताना 321 धावा करत सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले होते. यावेळी विंडीजकडून शाइ होपने नाबाद शतक झळकवताना विंडीजला पराभुत होण्यापासून वाचवले. तर, शिमरॉन हेतमायरने केलेल्या वेगवान 94 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली.

सामना बरोबरीत सुटल्यानंतर माध्यमांशी बोलताना विराट कोहली म्हणाला की, सर्वप्रथम मी सांगू इच्छितो आजचा सामना अतिशय उत्तम सामन्यांपैकी एक होता. याचे श्रेय वेस्ट इंडीजच्या संघाला जाते. वेस्ट इंडीजच्या संघा मधिल सर्वच खेळाडू या सामन्यात उत्तम क्रिकेट खेळले. हेतमायर आणि होपमुळे विंडिजच्या संघाने आपला पराभव टाळला. ज्यावेळी हे दोघे खेळपट्टीवर खेळत होते त्यावेळी आम्ही सामना गमावतो की काय अशी शंका मला वाटत होती. मात्र, आम्ही सामना बरोबरीत सोडवू शकलो हे आमचे भाग्यच म्हणावे लागणार आहे.

यावेळी पुढे बोलताना विराट म्हणाला की, सामन्यातील खेळ शेवटच्या सात षटकांअध्ये संपुर्न बदलला. यावेळी सामन्यावर विंडीज वर्चस्व गाजवत असताना आम्ही सामन्यात पुनरागमन केले होते. मात्र, उमेशने टाकलेल्या अखेरच्या षटकामध्ये त्या दोन चौकारांमुळे हा सामना बरोबरीत सुतला. तसेच यावेळी विराटने अंबाती रायुडूने केलेल्या फलंदाजीचे कौतूक करताना म्हणला की, रायुडू हा एक उत्तम फलंदाज असून त्याने आजच्या सामन्यात केलेली फलंदाजी त्याच्यातील गुणवत्ता सिद्ध करते. तो फिरकी गोलंदाजांसोबतच वेगवान गोलंदाजांचा सामना योग्य प्रकारे करु शकतो. त्या मुळे संघातील मधल्या फळीतील फलंदाजाची उणीव त्याच्या रुपाने भरुन निघाली आहे.

तर, यावेळी वेस्त इंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने सामन्यातील संघाच्या कामगिरी बद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, आमच्या संघाने आज उत्तम खेळ केला. त्यातल्या त्यात शाइ होप आणि हेतमायरयांनी सर्वोत्तम कामगिरी करत आम्हा विजयाच्या समीप नेऊन ठेवले. मात्र, आम्ही थोडक्‍यातच हा सामना गमावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)