साप हा माणसाचा मित्र आहे -राजू मुंबईकर

शिरगाव : पर्यावरण संवर्धन व सापांविषयी शारदा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना माहिती सांगताना राजू मुंबईकर.

सोमाटणे, (वार्ताहर) – साप हा माणसाचा शत्रू नसून मित्र आहे. मुळात साप खूप भित्रा प्राणी असल्याने तो मुद्दाम कोणाच्याही वाटेला जात नाही. जर कोणी त्याच्यावर आक्रमण केले तरच बचावासाठी हल्ला करतो, असे मत केअर ऑफ नेचर संस्था वेश्‍वीचे अध्यक्ष राजू मुंबईकर यांनी व्यक्‍त केले. आमदार प्रकाश देवळे माध्यमिक विद्यालय व शारदाश्रम प्राथमिक आश्राम शाळेतील विद्यार्थ्यांना सापांबद्दल खरी माहिती व्हावी, यासाठी आयोजित पर्यावरण संरक्षण कार्यशाळेत ते बोलत होते.

साईबाबा संस्थान शिरगावचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश देवळे यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे पर्यावरण संवर्धनाबाबत प्रबोधन केले. मुंबईकर यांनी आजपर्यंत 999 व्याख्याने दिली असून त्यांचे हे 1000 वे व्याख्यान होते. सापांच्या विविध प्रजातींची माहिती त्यांनी दिली. विषारी साप व विनविषारी साप यांची ओळख करून दिली. सापांविषयी असलेले अनेक गैरसमज दूर करण्यात आले. कार्यक्रमात अक्षरं शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे व खाऊ वाटप करण्यात आला.

कार्यक्रमास माजी आमदार प्रकाश देवळे, सपना लालचंदानी, वैभव पालकर, राकेश मुगळे, मुख्याध्यापक विजय लोखंडे उपस्थित होते. बद्रीनारायण पाटील, महादेव घुगे, हनुमान सुरनर, मच्छिन्द्र कापरे, संतोष चव्हाण यांचे सहकार्य लाभले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)