साप्ताहिक सुट्टीत बदल का करत नाही – हायकोर्ट

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी केली सूचना

मुंबई – वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा म्हणून वाहनखरेदीवर निर्बंध घालण्या बरोबरच सरकारी कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुटीत बदल करण्याचा विचार करा. अशी सूचना उच्च न्यायालयाने ऍडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी केली.

-Ads-

वाहतुक कोंडीवर उच्च न्यायालयाने वेळीवेळी दिलेल्या आदेशांची राज्य सरकारकडून योग्य त्या प्रमाणात अंमलबजावणी होत नसल्याने न्या. नरेश पाटील आणि न्या. नितीन सांब्रे यांच्या खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली आणि ऍडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोण यांना चांगले फैलावर घेतले.

अपंगाना सरकारी नोकरीत नियुक्ती करतानाही आरक्षण दिले जाते परंतू सेवा बढतीमध्ये आरक्षण मिळत नसल्याने दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने राज्य सरकारच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने वेळोवेळी प्रश्‍न उपस्थित करून त्यावर काही सूचना दिल्या. मात्र त्यावर सरकार गंभीर असल्याचे दिसून येत नाही. फूटपाथवरून नीट चालता येणे हा सर्वसामान्य नागरिकांचा हक्कच आहे. त्यासाठी सरकारने उपाययोजना केली पाहिजे. सरकार मात्र काही ठोस पावले उचलताना दिसत नाही.

वाहतूकीची कोडी फोडण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलण्या बरोबराच त्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या शनिवार, रविवार ऐवजी अन्य दिवासांमध्ये करणे शक्‍य आहे काय? या दृष्टीने विचार करा. तसेच वाहन खरेदीवर निर्बंध का आणता येईल का? पार्कीग व्यवस्थेवर काय करता येईल? याचा सविस्तर अभ्यास करून त्यावर ठोस पावले उचलून त्या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करा, असेही न्यायालयाने ऍडव्होट जनरल कुंभकोणी यांनी बजावले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)