सानिया मिर्झाचा सोनी ये!कडून `हिरोज बिहाइंड द हिरो’ पुरस्काराने सन्मान

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाला शिक्षक दिनाच्या पार्श्ववभूमीवर सोनी ये! चॅनेलने ‘हिरोज बिहाइंड द हिरोज’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे. क्रीडाक्षेत्रातील योगदान आणि तिच्या टेनिस अकॅडमीतून टेनिसमधून भविष्य घडवण्याच्या कार्यासाठी सानिया मिर्झाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

सानिया मिर्झाने हैद्राबाद येथे टेनिस अकॅडमी स्थापन केली आहे. येथे भारतीय टेनिसपटूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण दिले जाते, तसेच खेळ आणि त्याचे खेळाडूंबद्दल मोठी राष्ट्रीय जबाबदारी पूर्ण करण्यासाठी इच्छुक असलेल्यांच्या इच्छाही पूर्ण करण्यासाठी मदत केली जाते. तिचे हे कार्य पाहता सोनी ये! चॅनेलने ‘हिरोज बिहाइंड द हिरोज’ हा पुरस्कार सानियाच्या मिर्झाला दिला. याविषयी बोलताना सानिया मिर्झा म्हणाली की, हा पुरस्कार प्राप्त करताना मला अतिशय आनंद होत आहे, टेनिस क्षेत्राला पुन्हा काहीतरी देणे हे माझे स्वप्न होते आणि काही प्रमाणात बदल करू शकले ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. या पुरस्कारासाठी सोनी ये! ला मनापासून धन्यवाद देते. यासंबंधीची माहिती तिने सोशल मीडियावरून दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, टेनिस दुहेरीमध्ये सानिया मिर्झा जगातील माजी अव्वल क्रमांकाची खेळाडू राहिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)