शिवरायांची गनिमी कावा नीती वापरण्याची गरज

साध्वी सरस्वती मिश्रा : हिंदुत्ववादी संघटना समाजातील वैचारिक दहशतवादाच्या बळी

वाई – छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध हा हिंदवी स्वराज्यावर आलेले संकट संपविण्यासाठी केला होता. अफजल खानाने त्यावेळी हिंदू महिलांवर अत्याचार केले, गाईंची कत्तल केली, मंदिरे पाडली, या अत्याचाराच्या जाखडातून रयतेला मुक्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हे पाऊल उचलेले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याला शेकडो वर्षांचा कालावधी होवून गेला तरीही अफजलखान प्रवृत्ती आजही समाजात वावरताना दिसत आहे. समाजातील वैचारिक अफजल खान प्रवृत्ती गाढून टाकवी लागते त्याशिवाय दहशदवाद संपत नाही, असे परखड मत विश्‍वहिंदू परिषदेच्या मुख्य प्रचारक साध्वी सरस्वती मिश्रा (मध्यप्रदेश) यांनी केले. वाईतील प्रतापगड उत्सव समितीने आयोजित केलेल्या वीर जीवा महाले पुरस्कार प्रदान समारंभात त्या बोलत होत्या.

यावर्षीचा वीर जीवा महाले पुरस्कार व मानाचे कडे साध्वी सरस्वती मिश्रा यांना देण्यात आले. तर पंताजी काका बोकील अभिवक्ता पुरस्कार हा मुंबई उच्च न्यायालयाचे ऍड. सुभाष झा यांना परमपूज्य नंदगिरी महाराज (सोळशी) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक श्रीमती विजयाताई भोसले, नगराध्यक्ष सौ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, भाजपचे तालुकाध्यक्ष सचिन घाटगे, शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख प्रदीप माने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे यशवंत लेले, नगरसेविका सौ. वासंती ढेकाणे, नगरसेवक चरण गायकवाड, भारत खामकर, जीव महाले तेरावे वंशज श्रीमती सुमनताई सपकाळ, प्रतापगड उत्सव समितीचे खजिनदार सुहास पानसे, विवेक भोसले, पंडितराव मोडक, बाबूजी नाटेकर, अजय पावसकर, संजय बांदल, शिवसेना वाई शहरप्रमुख गणेश जाधव, योगेश चंद्रस, पंकज शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

साध्वी सरस्वती मिश्रा म्हणाल्या, हिंदू धर्माचे काम करणे गुन्हा झाला आहे. तसेच समाजातील आतंकवाद संपविण्यासाठी छ. शिवाजी महाराजांचा गामिनी कावा युध्द नीती वापरण्याची गरज आहे, अमेरिकेसारख्या बलाढ्य देशावर इस्राईल सारख्या अतिशय मामुली असणाऱ्या देशाने छत्रपती शिवाजी महाराजांची युध्द नीती वापरून विजय मिळविला आहे. शासनाने प्रतापगडावरील अतिक्रमण काढण्याचे धाडस करावे मात्र थडग्याला हात लावू नये कारण ते थडगे छ. शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक आहे.

या विचारांची आजच्या तरुण पिढीला नितांत गरज आहे. आधुनिक बदलामुळे तरुण पिढीला छ. शिवाजी महाराजांच्या विचाराचा विसर पडत चालला आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. प्रतापगड उत्सव समितीने दिलेला पुरस्कार अतिशय मोलाचा असून छ. शिवाजी महाराजांच्या भूमित तो प्रदान करण्यात आल्याने मी धन्य झाले. परमपूज्य नंदगिरी महाराज म्हणाले, चोहो बाजूनी हिंदुत्वावर घाला होत आहे. राज्यकर्त्यांना सत्तेत आल्यानंतर हिंदुत्वाचा विसर पडला आहे. आपल्या देशात धर्मासाठी झगडणाऱ्या माणसांची संख्या अल्प असून हिंदूच अल्पसंख्यांक झाले आहेत.

कार्यक्रमाची सुरुवात छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन व जीव महाले, पंताजी काका बोकील यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. त्यानंतर चित्तथरारक शास्त्रांची प्रात्यक्षिक व शाहीर शिवशाहीर रंगराव पाटील यांच्या पोवाड्याने व सादर केलेल्या अफजल खान वधाच्या नाट्याने कार्यक्रमाला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वीर जीवा महाले पुरस्कार, मानाचे कडे, मानचिन्ह, सन्मान पत्र प्रदान करण्यात आले. तर पंताजी काका बोकील अभिवक्ता पुरस्कार प्रदान आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)