साधे खासदार असलेल्या राहुल गांधींनी एवढी ‘माया’ जमवली कुठून? : रविशंकर प्रसाद

नवी दिल्ली : काँग्रेसतर्फे भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप लावले जात असतानाच आता भाजपचा बचाव करण्यासाठी रविशंकर प्रसाद यांनी या शाब्दिक चकमकीमध्ये उडी घेतली आहे. रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांच्या संपत्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणतात, “२००४ निवडणुकांमध्ये राहुल गांधींनी ५५,३८,१२३ रुपये संपत्ती जाहीर केली होती, त्यानंतर त्यांनी २००९ निवडणुकांमध्ये २ कोटी रुपये संपत्ती जाहीर केली होती तर २०१४ निवडणुकांमध्ये त्यांनी ९ कोटी संपत्ती जाहीर केली होती. २००४च्या ५५ लाखांच्या संपत्तीवरून राहुल गांधींची संपत्ती २०१४मध्ये ९ कोटींवर कशी काय गेली? ते साधे खासदार आहेत. त्यांच्या उत्पन्नाचे साधन काय आहे? हे त्यांनी देशाला जनतेला सांगावे.”

तत्पूर्वी काल भाजप नेते येडियुरप्पा यांनी केंद्रातील भाजप नेत्यांना तब्बल 1800 कोटी रूपये दिल्याच्या नोंदी स्वत: आपल्या हाताने केल्या असल्याचे वृत्त द कारवान नावाच्या एका नियतकालिकाने दिले होते त्याचा आधार घेत कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी देखील केली होती. तसेच हे प्रकरण खरे आहे की खोटे ते पंतप्रधान मोदींनी स्पष्ट करावे अशी मागणीही त्यांनी केली होती.

https://twitter.com/ANI/status/1109436552340332544

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)