साधू वासवानी मिशनचे दादा वासवानी यांचे निधन 

पुणे : सिंधी समाजाचे धार्मिक गुरु म्हणून ओळख असणारे साधू वासवानी मिशनचे प्रमुख दादा वासवानी यांचं निधन झालं आहे. मानवता, शांतता आणि शाकाहारचे संदेश देणारे दादा वासवानी यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. सकाळी नऊ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ९९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव साधू वासवानी मिशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

आध्यात्मिक गुरु साधू वासवानी यांनी स्थापन केलेल्या साधू वासवानी मिशनचे दादा वासवानी हे प्रमुख होते. त्यांच्यावर मागील तीन आठवड्यापासून रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)