साद-पडसाद: नैतिकता आणि चारित्र्य…

अपर्णा कुलकर्णी

ञ्चचशढे! प्रकरणात “दामिनी’ या चित्रपटातला एक संवाद आठवतो, दामिनी म्हणते ‘नही चाहिये मुझे इन्साफ़ जजसाहब, उर्मीका बलात्कार एक बार नहीं हुवा… बार बार हो रहा है! बार बार बलात्कार हो रहा है! ‘ हे असंच काहीसं आज “मीटू’ प्रकरणात होतंय का? आपण सगळेजण यासंदर्भातल्या बातम्या एका “वेगळ्याच दृष्टिकोनातून वाचतो आहोत का? बातम्या मात्र चविष्टपणे वाचायच्या आणि ” अरेरे, असे व्हायला नको होते,’ असे म्हणायचे, यात विसंगती नाही का?

गेल्या वर्षभरात अनेक घटना घडल्या! अनेक भ्रष्टाचाराचे खटले कार्यवाहीत आहेत , अनेक अपघात झाले, ज्यात हकनाक बळी गेले, अनेक सामूहिक बलात्कार झाले, सामूहिक आत्महत्या झाल्या, प्रतिष्ठित लोकांच्याही अनाकलनीय आत्महत्या झाल्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अनेक मोर्चे, बंद! या झाल्या वाईट घटना… चांगल्या घटनाही घडल्याचं की जसे, सर्जिकल स्ट्राईक झाला, तलाकविरोधी कायदा पास झाला, मेट्रो सुरू झाल्या, खेळामध्ये भारताची कामगिरी चांगली झाली, आपण मंगळावर पोहोचलो, कितीतरी पण गेल्या काही महिन्यांपासून एकच एक बातमी आपल्या महाकाय देशाला व्यापून उरलीय ती म्हणजे ञ्च चशढे!

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपला देश अनुकरणप्रिय आहे यात शंकाच नाही! आपल्याला सतत कुणीतरी, काहीतरी सांगावं लागतं, किंवा कोणाचं तरी पाहून मग आपल्याला अक्कल येते. खरं तर ञ्च चशढे! ही संकल्पना फार जुनी आहे आणि आपल्या संस्कृतीत सगळ्यात आधी तिचा विचार केला गेला. सीता आणि द्रौपदी यांनी ञ्च चशढे! म्हणून नुसताच गोंधळ घातला नाही, तर त्यामुळे रामायण आणि महाभारत घडलं हे सर्वज्ञात आहे. मी या चळवळीच्या विरोधात नाही. पण सारासार विवेकबुद्धी जागी ठेवून या प्रश्‍नांकडे बघायला हवं आहे. दोन गट करून दोन्ही बाजूंनी अश्‍लील शेरेबाजी करणं कितपत योग्य आहे. ज्या संवेदनशीलतेने हा प्रश्‍न हाताळायला हवा, त्या पद्धतीने तो हाताळला जातोय का?
ञ्च चशढे! चळवळीची भीती वाटायला हवी तर त्याचं हसं होतं आहे आणि हे खूप क्‍लेशदायक आहे. सवंग लोकप्रियतेसाठी या सगळ्या प्रकाराचा वापर होतोय.

चारित्र्य आणि नीतिमत्ता या दोन्ही गोष्टी फक्त आणि फक्त शारीर गोष्टींशी जोडल्या जाताहेत आणि इथेच खरी गल्लत होतेय. इथे मला शिवलीलामृतातील बाराव्या अध्यायात महानंदा या वेश्‍येचा केलेला उल्लेख आठवतो. महानंदा ही वेश्‍या नीतिवान, चारित्र्यवान असा उल्लेख केला आहे. कारण तिने एक दिवस एखाद्या पुरुषाला वरलं तर ती इंद्रालाही वश होत नसे. आता इथे फक्त मी हे एक उदाहरण दिले आहे की, चारित्र्य आणि नीती या दोन्ही गोष्टींचा संबंध थेट निष्ठेशी आहे. मग पुरुष असो किंवा स्त्री ! निष्ठा असणं मग ती कामाप्रती असो, देशाप्रती असो, प्रेमाप्रती असो किंवा आपल्या संस्कृतीप्रती असो; ती माणसाला चारित्र्यवान बनवते. फक्त शारीर शुचितेची चर्चा करून हे शब्द बुळबुळीत करून टाकलेत आपण.

आता संस्कृती म्हणजे काय याचा विचार कितपत गांभीर्याने आपण घेतो? हा ही एक प्रश्‍नच आहे! धर्मअंधता, अंधश्रद्धा किंवा कर्मकांडे म्हणजे संस्कृती नव्हे. प्रत्येकाने आपापल्या बुद्धीनुसार, कुवतीनुसार संस्कृतीचा अर्थ लावला आणि त्याला घट्ट चिकटून बसले आणि या सगळ्यामुळे आपली तरुण पीढी आपल्या संस्कृतीबाबतीत उदासीन आहे. स्त्री स्वातंत्र्य हे फक्त तिने घालायच्या कपड्यापर्यंतच मर्यादित न राहता तिच्या निर्णय क्षमतेवर अधिक भर असावा. पुरुषांच्या नजरेत आणि डोक्‍यात जोपर्यंत नग्नपणा आहे, तोपर्यंत या कशालाच अर्थ नाही आणि त्यासाठी मुळापासून सुरुवात करावी लागणार आहे. अतिशय बुद्धिमान आणि निर्णयक्षम स्त्रियांची आपल्याला परंपरा आहे. त्याचा आदर वाटायला लागेल, अशा पद्धतीने आपण स्वातंत्र्य घ्यायला हवं आहे. इथे मला सुधा मूर्तीचं उदाहरण द्यावस वाटतं. त्या आधुनिक, स्वतंत्र आहेतच आणि स्वातंत्र्याचा खरा अर्थ त्यांना समजला आहे.

मला वाटतं फक्त ञ्च चशढे! म्हणून आणि मीडियामध्ये जाऊन हे प्रश्‍न सुटणार आहेत का? त्यासाठी पुढची पिढी वैचारिकदृष्ट्य्‌ा सक्षम बनवणं जास्त गरजेचं आहे. चारित्र्य आणि नीतिमत्तेची व्यापक संकल्पना समजावून सांगणं गरजेचं आहे. फक्त एकाच बाबतीत हे न घडू देता अनेक बाबतीत ञ्च चशढे! चळवळ घडणं जास्त गरजेचं आहे. आज आपल्या देशाची ती गरज आहे. नाहीतर विकसनशील ते विकसित हा टप्पा पार करण्यासाठी अनेक युगं जातील. देशात भ्रष्टाचार करणाऱ्याविरुद्ध, शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्याविरुद्धही एक नवी चळवळ उभी राहिली पाहिजे, स्त्रीभ्रूण हत्येविरुद्धही चळवळ उभी राहिली पाहिजे.

मग स्त्रीने असे अत्याचार सहन करावेत का? तर अजिबात नाही उलट अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचीच आपली परंपरा आहे. पण त्यासाठी सवंग लोकप्रियतेचा मार्ग कोणी अवलंबू नये.

शेवटी माझ्या हातात काय आहे, तर शक्‍य होईल तितकं पुढच्या पिढीला सुसंस्कारित करणं. नुकताच “सिक्रेट सुपरस्टार’ हा सिनेमा पाहात होते, त्यात ती मुलगी आईला म्हणते “तुम स्टुस्पिड हो’ काय म्हणायचं यावर? प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते, प्रत्येक नात्याची एक गरिमा असते… ती अशा वागण्यातून काय रहाणार? आता संस्कार म्हणजे फक्‍त घरातूनच होतात असं नाही, तर समाजातूनही ते होत असतात. मग समाजाला एखादी गोष्ट देताना त्याचा नीट विचार नको का व्हायला? प्रत्येक नात्याचा एक अभिमान असतो, प्रत्येक नात्यात आदर असला पाहिजे तो जपला की बरेचसे प्रश्‍न सुटतील असं वाटतं. त्यामुळे या समस्येच्या मूळाशी जाऊनच ञ्च चशढे! म्हणता यायला हवं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)