“साथ मैत्रीची’ ग्रुपतर्फे बालगृहास धान्याची मदत

जामखेड – दी ग्रामीण विकास केंद्र संचालित निवारा बालगृहातील अनाथ, निराधार, लोककलावंत, ऊसतोड मजूर, वीटभट्टी कामगार, आदिवासी, दलित व भटके विमुक्त समाजातील वंचित घटकातील गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुरू असलेल्या बालगृहातील विद्यार्थ्यांना “साथ मैत्रीची’ ग्रुपतर्फे धान्याची मदत देण्यात आली. यावेळी वांबोरी (ता. राहुरी) येथील “साथ मैत्रीची’ या ग्रुपचे सदस्य रायभान पंडित यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना असलेली सामाजिक कामाची आवड व आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो आहोत ही जाणीव करून देत समाजातील इतरांनादेखील या कार्यातून संदेश दिला. याप्रसंगी निवारा बालगृहाचे शिक्षक बाबासाहेब डोंगरे यांनी आलेल्या मान्यवरांचा सत्कार केला. संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली व बालगृहातील मुलांच्या शिक्षणासाठी पुढील काळात सोबत राहून एकत्रित काम करण्याचे आवाहन केले.
यावेळी निवारा बालगृहातील मुलांच्या जेवणासाठी 3 क्विंटल धान्याच्या मदतीबद्दल शिक्षक बाबासाहेब डोंगरे यांनी मान्यवरांचे आभार मानले. यावेळी पांडू गवते, बाळू गवते, सोमनाथ गडाख, रायभान पंडित, सचिन इवरे, आदींसह बालगृहातील विद्यार्थी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)