साथीच्या आजारांवर महापालिका ढिम्म

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. मात्र, महापालिका प्रशासन अद्याप ढिम्म आहे, असा संताप व्यक्त करत महापालिकेने साथीचे आजार रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली.

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका आयुक्‍त हर्डीकर यांच्यासमवेत बैठक घेतली. आमदार गौतम चाबुकस्वार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिलकुमार रॉय, शिवसेना जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, नगरसेवक निलेश बारणे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, महिला संघटीका उर्मिला काळभोर, माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे आदी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, शहरात स्वाईन फ्लूने 28 जणांचे बळी घेतले आहेत. स्वाईन फ्लू पाठोपाठ आता डेंग्यूने विळखा घातला आहे. जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात डेंग्यूची लागण झालेले 103 तर 1261 संशयीत रूग्ण आढळले आहेत. सध्या रूग्णालयांत तुडूंब गर्दी पहायला मिळत आहे. महापालिकेचा अधिकारी देखील यामध्ये मृत्यूमुखी पडला. महापालिका ही बाब गांर्भियाने घेत नसून साथीच्या आजाराला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे आवश्‍यक आहे.

स्वच्छते बरोबरच डासाचे व डेंग्यूचे डास निर्माण होणारे केंद्र नष्ट केली पाहिजेत. शहरामध्ये औषधाच्या फवारणी करणे गरजेचे आहे. औषधाचा साठा मुबलक प्रमाणात ठेवण्यात यावा गरीब रूग्णांसाठी महापालिकेच्या सर्व रूग्णालयात सोय उपलब्ध करून द्यावी. तसेच खासगी रूग्णालयात रुग्णांची होत असलेली लूट थांबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेवून कमी उत्पन्न गटातील नागरिकांना जागा उपलब्ध करण्याबाबतच्या सूचना खासदार बारणे यांनी बैठकीत केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)