साथीच्या आजारांचा शहरवासीयांना “डंक’

प्रशासनावर ताण : “वायसीएम’मध्ये खाटांपेक्षा जास्त रुग्ण

पिंपरी – शहरातील बदलत्या वातावरणामुळे स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरिया यासारख्या जीवघेण्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. यामुळे, शहरातील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी मोठ्या संख्येने रुग्ण दाखल झाल्याने खाटांची संख्या अपुरी पडत आहे. रुग्णालयातील काही विभागात क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

-Ads-

शहरात आजाराची साथ आल्याने नागरिकांना सर्दी, खोकला, थंडी, तापाचे रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. शहरातील जिजामाता, तालेरा रुग्णालयाचे विस्तारीकरण व सध्या भोसरीतील नव्याने सुरु असलेल्या रुग्णालयाच्या बांधकामामुळे वायसीएम रुग्णालयात रुग्णांची संख्या
वाढली आहे. गेल्या पंधरा दिवसापासून रुग्णांची संख्या वाढत असून वायसीएममध्ये क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण दाखल झाल्याने वायसीएम प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रुग्णालयात 750 खाटा असून त्यापेक्षा जास्त रुग्ण दाखल झाले आहेत. तसेच, उपचारासाठी दाखल झालेले रुग्ण सर्दी, खोकला, तापाचे जास्त आहेत. वायसीएम रुग्णालयात काही विभागात एका खाटेवर दोन रुग्ण ठेवल्याचे दिसून आले आहे.

“”महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण दाखल झाले आहेत. मात्र, रुग्णालयात आलेल्या सर्व रुग्णांना योग्य व वेळेत उपचार देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. महापालिकेच्या इतर रुग्णालयांचे कामकाज लवकरात-लवकर सुरु झाल्यास वायसीएम रुग्णालयावरील ताण कमी होईल. तसेच, शहरातील महापालिकेच्या इतर रुग्णालयांचे विस्तारीकरण सुरु असल्याने वायसीएम रुग्णालयात रुग्ण संख्या वाढली आहे.” अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.

स्वाईन फ्लूचे 29 संशयीत…
“”स्वाईन फ्लू आजाराने शहरात थैमान घातले आहे. जानेवारी महिन्यापासून अद्यापर्यत पाच रुग्ण दगावले आहेत. तसेच, 29 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले असून त्यातील दोन रुग्ण खासगी रुग्णालयात कृत्रिम श्‍वासोच्छवासावर आहेत. शहरात गेल्या दीड महिन्यात चार रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. यामुळे, स्वाईन फ्लू’ आजाराला रोखण्याचे महापालिकेसमोर आवाहन उभे राहिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)