सात वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपातून वडिलांची निर्दोष मुक्तता

पुणे – सात वर्षाच्या पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपातून 28 वर्षीय वडिलांची न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. विशेष न्यायाधीश आर.एन.सरदेसाई यांनी हा आदेश दिला आहे.
याबाबत त्या मुलीच्या आईने म्हणजे आरोपीच्या पत्नीने उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. बचाव पक्षातर्फे ऍड. बी.ए.आलुर आणि ऍड. रणजित ढोमसे पाटील यांनी काम पाहिले. ही घटना 3 जून 2017 रोजी खडकवासला भागात घडली. हे कुटुंब मूळचे उस्मानाबादचे आहे. ते खडकवासला भागात भाड्याच्या खोलीत राहते. आरोपीला दारूचे व्यसन आहे. घटनेच्या दिवशी आरोपी दारू पिला होता. त्यामुळे
पती-पत्नीमध्ये भांडण झाले. त्यामुळे फिर्यादी घरातून बाहेर जावून रस्त्याच्या कडेला बसल्या होत्या. त्यावेळी आरोपी तिथे गेला. त्याने रस्त्यावर शरीर संबंधाची फिर्यादीकडे मागणी केली. त्यास फिर्यादीने नकार दिल्याने घरात जावून सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. आरोपीने मुलीवर बलात्कार केला नाही. नवरा-बायकोचे भांडण झाले होते. त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्याच्या सांगण्यावरून मुलीवर बलात्कार केल्याची खोटी फिर्याद दाखल केल्याचा युक्तीवाद ऍड. आलुर यांनी केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)