हैदराबाद: अवघ्या सात वर्षांच्या समन्यू पोथूराजूनं देशाची मान अभिमानाने उंचावणारी कामगिरी केली आहे. हैदराबादच्या समन्यू पोथूराजूने आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर सर केले आहे. समन्यूने आफ्रिकेतील माऊंट किलिमांजारोवर यशस्वी चढाई करत तिरंगा फडकावला. ध्येय कितीही मोठे असले, तरी अथक प्रयत्नानंतर ते कमी वयातही साध्य करता येते, हे समन्यूने दाखवून दिले आहे.

आफ्रिकेच्या टांझानियातील माऊंट किलिमांजारो शिखर करणे अवघड मानले जाते. या भागातील तापमान कमी असल्याने पर्वतावर चढाई करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र सर्व अडचणींवर मात करत सात वर्षांच्या समन्यूने समुद्रसपाटीपासून 5 हजार 895 मीटर उंचीवर असणारे किलिमांजारो शिखर त्याच्या प्रशिक्षकांसोबत सर केले. ‘जेव्हा आम्ही चढाई सुरू केली, तेव्हा पाऊस सुरू होता. संपूर्ण वाट दगडांनी भरलेली होती. त्यावेळी मी अतिशय घाबरलो होतो. माझे पाय खूप दुखत होते. मात्र मी थोडा वेळ विश्रांती घेतली आणि पुन्हा चढाई सुरू केली. मला बर्फ खूप आवडतो. त्यामुळेच चढाईसाठी किलिमांजारो शिखराची निवड केली,’ असे समन्यूने सांगितले.

समन्यू किलिमांजरोवर सर्वात कमी वयात यशस्वी चढाई करणारा गिर्यारोहक ठरला आहे.  समन्यूच्या कामगिरीवर त्याची आई प्रचंड खूष आहे. ‘माझ्या मुलाने विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न केला, याचा खूप आनंद आहे. मला प्रकृतीच्या कारणास्तव त्याची साथ देता आली नाही. मात्र त्याने हार न मानता प्रयत्न कायम ठेवले आणि तो यशस्वी झाला,’ अशी प्रतिक्रिया समन्यूच्या आईने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)