सात लाखांचा दंड वसूल

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्लॅस्टीक वापरणाऱ्या 141 जणांवर कारवाई करत 7 लाख 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

राज्य शासनाच्या अधिसुचनेनुसार 2 जुलैपासून शहरात प्लॅस्टीक व थर्माकोलच्या वस्तूवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेने 141 जणांवर दंडात्मक कारवाई करत 7 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. यासाठी महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण 32 पथकांची नियुक्ती केली आहे. शहरात प्लॅस्टीकचा वापर करणारे व्यावसायिक व नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत 1 हजार 879 किलो प्लॅस्टीक जप्त केले आहे.

शासन आदेशानुसार सर्व प्लॅस्टीकच्या बॅग, ग्लास, थर्माकॉल, हॉटेलमध्ये वापरले जाणारे प्लॅस्टीकचे पॅकेजिंग साहित्य यावर बंदी घालण्यात आली आहे. उत्पादन करताना वापरले जाणारे प्लॅस्टीक वेष्टन व 50 मायक्रॉनपेक्षा जास्त जाड असलेले प्लॅस्टीक, प्लॅस्टीकचा एक थर असलेला पुठ्ठा, दुधाच्या पिशव्या, पुनर्चक्रण होणारे पॅकेजींग, घरगुती वापरातील प्लॅस्टीकच्या वस्तू यांना सरकारने वगळले आहे. याव्यतिरीक्त प्लॅस्टीक वापरल्यास कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)