सात महिने आधीच भाजपच्या मंत्र्यांनी साजरी केली गुरुनानक जयंती

नवी दिल्ली : सोशल मीडियावर उत्तर प्रदेश सरकारमधील काही मंत्री सध्या बरेच चर्चेत आहेत. कारण या मंत्र्यांनी  जवळपास सात महिने आधीच गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, भाजपा प्रवक्ते आणि आरोग्य मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह, वैद्यकिय शिक्षण मंत्री आशुतोष टंडन आणि कायदा मंत्री ब्रजेश पाठक यांचा समावेश आहे.

हिंदू दिनदर्शिेकेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गुरुपूरब म्हणजेच गुरुनानक जयंती साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी २३ नोव्हेंबरला हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. पण, ट्विट करण्यापूर्वी ही बाब लक्षात न आल्यामुळे त्यांच्यावर सर्वांसमोरच तोंडघशी पडण्याची वेळ आल्याचं पाहायला मिळाले. ही बाब लक्षात आल्यानंतर मंत्र्यांनी त्या आशयाचे ट्विच डिलीटही केले. सिद्धार्थ नाथ सिंह यांनी या चुकीचे गांभीर्य लक्षात घेत सर्वांचीच माफी मागितली. माफी मागताना केलेल्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी या सर्व गोंधळाचे खापर विकीपीडियाच्या माथ्यावर फोडले. ज्यामध्ये त्यांनी यासंबंधीचा एक स्क्रिनशॉटही जोडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)