सात-बारा खोडून केले बनावट खरेदीखत

तळेगाव ढमढेरेत जमीन विक्री करणारे, घेणाऱ्यावर गुन्हा दाखल
शिक्रापूर – तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे जमिनीवर महसुली दावा चालू आहे, हे माहित असतानादेखील सातबारा उताऱ्यावर खाडाखोड करून जमिनीचे खरेदीखत करून दिल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत तळेगाव ढमढेरे दुय्यम निबंधक कार्यालयचे निबंधक विनायक भालचंद्र तपस्वी यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी जमीन विक्री करणारे कुलदीप विजयसिंह जगताप, राहुल विजयसिंह जगताप (दोघे रा. सिद्धिविनायक अपार्टमेंट प्लाझा, सलाटवाडा जि. वडोदरा, गुजरात) तसेच जमीन खरेदी करणारे प्रदीप तुकाराम जाधव (रा. शिक्षक सोसायटी केशवनगर मुंढवा, ता. हवेली) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व तळेगाव ढमढेरे दुय्यम निबंधक कार्यालयाचे निबंधक विनायक तपस्वी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील जमीन गट नंबर 106 मधील 1 हेक्‍टर 58 आर या जमिनीचे मालक कुलदीप जगताप व राहुल जगताप हे असून त्यांचा त्या जमिनीचा जमिनीचे कुळ असलेले गोविंद भिवराव जगताप, परशुराम भिवराव जगताप, नरसिंग भिवराव जगताप, दामोदर भिवराव जगताप या चौघांचा या जमिनीबाबत कुळ कायद्यांतर्गत 32 (ग)चा महसुली दावा न्यायालयात सुरु होता; परंतु या जमिनीचा महसुली दावा सुरु असताना देखील जमिनीचे मालक कुलदीप जगताप व राहुल जगताप यांनी दावा सुरु असल्याची माहिती असताना देखील ती लपवत जमीन गट नंबर 106चे सात बारा उताऱ्यामध्ये भूधारणा उताऱ्यामध्ये “खा’ असे लिहून त्यावर काट मारून खोडून खाडाखोड करून नवीन शर्तीबाबत व कुळकायद्याप्रमाणे सक्षम अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता या जमिनीचा दस्त तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात करून ती जमीन प्रदीप तुकाराम जाधव यांना विकली. त्यामुळे कुलदीप जगताप व राहुल जगताप यांनी सातबारा उताऱ्यामध्ये खाडाखोड करून शासनाची फसवणूक केली व खोटे कागदपत्र खोटे आहेत हे माहित असताना देखील ते खरे म्हणून कामकाजात वापरून खरेदीदस्त बनवून शासनाची फसवणूक केली असल्याचे समोर आले.
पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)