सात ग्रामपंचायतीच्या 27 मे रोजी निवडणूक

वडगाव  – मावळ तालुक्‍यातील जून ते सप्टेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार मावळ तालुक्‍यातील सात ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार मावळ तालुक्‍यातील ओव्हळे, दिवड, कलाट, सुदुंबरे, सुदवडी, कोंडीवडे व जांबवडे या सात ग्रामपंचायतीची निवडणूक 27 मे रोजी होणार असल्याची माहिती तहसीलदार रणजित देसाई व नायब तहसीलदार सुनंदा भोसले यांनी दिली.

यामध्ये दि. 7 ते 12 मे उमेदवारी अर्ज दाखल करणे, 14 मे रोजी आलेल्या अर्जाची छाननी करणे, तर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 16 मे आहे. 27 रोजी मतदान होईल. आणि 28 रोजी वडगाव येथील महसूल भवनात मतमोजणी करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)