पुणे : सात गुन्हेगारांना शहर व जिल्हयातून एक वर्षासाठी हद्दपार

पुणे – भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार टोळीतील सात गुन्हेगारांना शहर व जिल्हयातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई परिमंडळ दोनचे उपायुक्त डॉ.प्रविण मुंडे यांनी केली आहे.
गणेश लक्ष्मण लगस(67,रा.संतोषनगर), गजानन शिवानंद स्वामी, ऋषीकेष सिध्दार्थ नंदुरे, किरण संदिप वाडकर, किरण प्रल्हाद मोरे, निखील दिनेश चव्हाण, विजय लक्ष्मण लगस अशी आरोपींची नावे आहेत. या टोळीचा प्रमुख गणेश लगस आहे. हे सर्व जण टोळीच्या माध्यमातून तसेच वैयक्तीक गुन्हे करत होते. त्यांच्या विरुध्द खून , खुनाचा प्रयत्न, जखमी करणे, धमकी देणे, दुखापत करणे, दरोडा तयारी, प्रतिबंधक आदेशाचा भंग चोरी असे गुन्हे भारती विद्यापीठ, दत्तवाडी, स्वारगेट आणी सहकारनगर पोलीस ठाणे येथे दाखल आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)