सात गावांतील संसार रस्त्यावर

खळद- पुरंदर तालुक्‍यातील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमातळास केंद्र व राज्य सरकारकडून कधीच “हिरवा कंदिल’ मिळाला आहे. आता या विमानतळाच्या जागेबाबतचा अध्यादेश व शेतकऱ्यांचे गट क्रमांक त्यांच्या परस्पर जारी केल्याने सात गावांतील शेतकरी आक्रमक झाले आहे आहेत. त्यांनी आज (सोमवारी) सात ही गावांतील मुख्य चौकामध्ये आपल्या जनावरांसह संपुर्ण संसार रस्त्यावर जक्काजाम आंदोलन करून ठिय्या मांडल्याने सातही गावतील रस्त्याच्या दुर्तफा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
विमानतळाकरीता एखातपूर, कुंभारवळण, मुंजवडीखानवडी, वनपुरी, उदाची वाडी, पारगाव या सात गावांतील 2 हजार 832 हेक्‍टर जमिनीच्या भूसंपादनाची अधिसूचना राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने काढली आहे. तसेच या विमानतळासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची (एमएडीसी) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून शासनाने नियुक्ती केली आहे. या अधिसूचनेमुळे विमानतळाच्या जागेवर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, हा अध्यादेश व गट क्रमांक शेतकऱ्यांच्या परस्पर जारी करण्यात आल्याने शेतकरी पुन्हा आक्रमक झाला असून तो संसारसह आता रस्त्यावर उतरल्याने विमातळाबाबतचा प्रश्‍न पुन्हा चिघळ्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, या सात गावांतील मुख्य चौकात आज ग्रामस्थांनी गाई, म्हशी, बैलगाडीसह आपला सगळा संसार रस्त्यावर उतरवून ठिय्यासह चक्काजाम केल्याने सात ही गावातील रस्त्यांवर दुर्तफा एक ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होता. तर “जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, विमानतळाच करायचे काय, खाली डोके वर पाय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडत शासनाच्या विरोधात घोषणा देत निषेध केला.
यावेळी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी आंदोलना ठिकाणी भेट दिली व शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय एक इंच जमीन कोणी घेऊ शकत नाही असे सांगितले तर पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते यांनी विमानतळ बाधित गावांवर मोठा अन्याय होत असून येथील लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असून नागरिकांना फसवी स्वप्न दाखवत असल्याचे नमूद केले. यावेळी पुरंदरचे नायब तहसीलदार जाधव व सासवडचे पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी एखातपूर, खानवडी मुजवंडी, कुंभारवळण गावचे सरपंचासह मनीषा होले, उपसरपंच वैजनता होले, रामदास होले, वर्षा खोमणे, रवींद्र फुले, शंकर नेटके, राहुल चौरे, रत्नाकर होले यांच्यासह परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

 • आजपर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन करून विमानतळास विरोध दर्शविला आहे तरीही झोपलेल्या शासनास काहीच फरक पडत नसून भविष्यात तीव्र स्वरूपाचा लढा उभारण्यात येणार आहे.
  – दत्ता झुरंगे, अध्यक्ष विमातळ विरोधी संघर्ष समिती
 • गावनिहाय भूसंपादन होणारे क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)
  वनपुरी – 339
  उदाचीवाडी – 261
  कुंभारवळण -351
  एखतपूर -217
  मुंजवडी – 143
  खानवडी – 484
  पारगाव -1037
  एकूण – 2832

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)