सात खासदार आणि 199 आमदारांनी दिले नाहीत पॅन नंबर्स

 नवी दिल्ली: निवडणूक अर्ज दाखल करताना उमेदवाराने आपले पॅन क्रमांक त्या अर्जात भरणे आवश्‍यक असते पण देशात निवडून आलेल्या सात खासदारांनी आणि एकूण 199 आमदारांनी अद्याप आपले पॅन नंबर्सच सादर केलेले नाहींत अशी माहिती निवडणूक आयोगाच्या अहवालात देण्यात आली आहे.
देशातील लोकसभेचे एकूण 542 खासदार आणि 4086 आमदारांच्या पॅन नंबर्सची माहिती त्यांच्या अर्जावरून घेण्यात आली त्यात ही बाब स्पष्ट झाल्याचे आयोगाच्या अहवालात म्हटले आहे. ज्या आमदारांनी आपले पॅन नंबर अद्याप निवडणूक आयोगाला दिलेले नाहीत त्यात भाजपच्या 42, कॉंग्रेसच्या 51, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या 25 आमदारांचा समावेश आहे असेही यात नमूद करण्यात आले आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)