सात किलो प्लॅस्टिक जप्त

पिंपरी – बंदी असतानाही व्यावसायीक उपयोगासाठी प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांच्या प्रबोधनाबरोबरच दंडात्मक कारवाईची मोहीम पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत असून क क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाने गुरुवारी (दि. 20) केलेल्या कारवाईत सात किलो प्लॅस्टीक जप्त करून पंधरा हजार रूपयांचा दंड वसूल केला.

क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी आर. एम. भोसले व आरोग्य निरीक्षक सचिन जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. मासुळकर कॉलनी परिसरातील विविध व्यावसायिकांची तपासणी करीत असताना तीन व्यावसायिकांकडून प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर होत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून प्लॅस्टीक जप्त करण्याबरोबरच दंड वसूल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)