सात किलो चांदीसह लाखोंचा ऐवज लंपास

पिंपरी – सराफी दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी सात किलो चांदीसह लाखोंचा ऐवज लंपास केला. दिघी येथील कल्याणी ज्वेलर्समध्ये ही घटना घडली.

मनीष चंदनमल जैन (वय-25, रा. विशालनगरी, दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष यांचे साई पार्क, शिव गणेश कॉलनी, दिघी येथे कल्याणी ज्वेलर्स हे दुकान आहे. बुधवारी रात्री दुकान कुलूप लावून बंद केले. त्यानंतर गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील 6 किलो 800 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, 20 मूर्ती आणि इतर भांडी असा एकूण 2 लाख 4 हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)