सात अवस्था…

वृंदा कार्येकर 

मागे एक पुस्तक वाचलं होतं त्यात असं म्हटलं होतं की आपण 7 अवस्थांमधून प्रवास करतो . सुरूवात होते दगड , मग वनस्पती , नंतर पशु ,मानव, महामानव, अतिमानव ,देवमानव. मला हे पटलं होतं.

मग मी आसपास निरीक्षणं करायला लागले . तर लक्षात आलं की दगडा पासून वनस्पती नंतर पशु व शेवटी मानव .
मग वनस्पतीरूप असताना त्यातूनच ऊत्क्रांती होताना वनस्पतीसाठी त्याचा जीव तुटत कसा नाही ? असं काय होतं की ही संवेदनशीलता हरवते . शोध शोघ शोधलं पण ऊत्तर नाही सापडलं . नंतर पशुमानवांची खूप ऊदाहरणे पाहिली.

जिथे खातो तिथचं घाण करणं विचार न करता कृती करणं . दुसऱ्यावर सतत ओरडणं किंवा भुंकणं ,वसकन्‌ अंगावर येणं या पशुसवयी पुढे मनुष्य जन्म लाभला तरी तशाच रहातात कोल्ह्याला लबाड का म्हणतात माहित नाही पण असे लबाड कोल्हे खूप दिसतात . जागोजागी . पण मला लबाड स्वार्थी मार्जार जमातही खूप दिसते . सापही खूप आहेत ऊलटणारे ,डंख करणारे.

सहज नजर टा का ,आसपास सारे पशुरूप मानव खूप दिसतील. जगात ऊर्जा अपरंपार नाही एकाचं दुसऱ्यात परिवर्तन होतं मग तसचं या जीवसृष्टीचही होत असणार .आधी पशु मग मानव म्हणजे सारे आधी पशुतूनच मानव जन्मात आले असणार.

मग ऊन्नयन होत गेलं तर मानवाचे महा ,अति, देव असं परिवर्तन होत असणार म्हणजे जगात सरमिसळ आहे साऱ्यांची .एकाच वेळी 5प्रकारचे मानव येथे आहेत पातळ्या वेगळ्या . असचं म्हणावं लागेल .मगआपण सध्या कोणत्या पातळीला हे कसं ओळखणार? गुण शोधायचे मानवी व पशुमानवी . त्यात मानवी गुण जास्त भरले तर माणूस नाहीतरी म्हटलचं आहे.

साहित्य संगीत कला विहीन साक्षात पशु पुच्छ विहीनः म्हणजे आता एक नवा खेळ शोध सुरू करायला हरकत नाही . मला जेव्हा हे समजलं तेव्हा सुरू केलं होतं , वेळ चांगला जायचा . अर्थात एखादाच प्रसंग असेल तर निष्कर्षाची घाई नाही करायची.

हळूहळू कळतं, वाट बघायची. म्हणून मला डार्विनच्या संशोधनात हे असं का नाही ?हाही विचार येतो . भारतीय तत्वज्ञानात कोणत्याही पशुपासून मानव जन्म मिळू शकतो असं वारंवार वाचलयं . मग डार्विन वेगळं म्हणतो संगती कशी लावायची ? तेही खरं नि हेही खरं असचं नेहमी वाटतं .

पुढे शोध लागेलही .तोपर्यंत या पशुमानवांचा शोध घेते कधी कधी माणसंही सापडतात मग . या शोधात पण मजा येते एवढं मात्र खरं !करताय सुरूवात ? मलाही कळवा तुमचा शोध.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)