साता समुद्रापलिकडची अनोखी मैत्री …(प्रभात open house)

खरं तर फेसबुक आणि whats app च्या आभासी जगतातील अनोळखी लोकांशी मैत्री करावी आणि बोलावं हे खरं तर किती असुरक्षित आणि विश्वास ठेवण्याजोग आहे हा सध्या वादाचा मुद्दा आहे मात्र अशा अभासी जगात तुम्हाला खरंच काही छान मित्र मिळून जातात की आपल्यालाही आश्चर्य वाटतं आणि वाटतं फेसबुकची निर्मिती याच माणसं जोडण्याच्या मुळ उद्देशाने झाली असावी !! फेसबुक मुळे आपली मैत्री जगभरातील लोकांशी झाली तर किती छान होईल !!!

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपल्याला त्यांचे विचार ,पध्दती ,राहणं ,सण, उत्सव,रुढी प्रथा याबाबतीत त्यांच्याशी थेट बोलता येईल या उद्देशाने माझी फेसबुक वरील चित्रकांच्या समुहातील युक्रेनच्या प्रसिध्द चित्रकार हेलन पेनेस्युक हीच्याशी ओळख झाली ….खरं तर सुरुवातीला आमचं बोलणं चित्रकलेतील अनेक पध्दतींवर होत असे. यात मी नवखा असल्यामुळे मी काढलेली चित्रे तिला पाठवून त्याबाबत काही सल्ले घेत असे…..अशाच संवादाने हळूहळू मैत्रीची जागा घेतली आणि आम्ही भारतीय माणसं आयुष्य ,त्याचं राहणीमान,आचार विचार यावर बोलू लागलो. त्यात मग युरोपीयन लोकांचं भारतीय सणां बद्दलचं आकर्षण हा तर खुप महत्वाचा मुद्दा होता.  कारण आपल्याकडे कायम वर्षभर काहीना काही सण चालू असतात.

तिकडे मात्र फक्त नविन वर्षाची सुरुवात आणि ख्रिसमस हेच दोन सण आहेत. हळूहळू माझी तिच्या नौसैनिक असलेल्या नवऱ्याशी आणि मुलीशीही ओळख झाली. अनेक महीने समुद्रातच वावरणाऱ्या तिच्या नवऱ्याला मी त्याची विचारपूस करणारे संदेशांची भारी आत्मियता वाटते. हेलन एक प्रतिथयश चित्रकार म्हणून युरोप मधे प्रसिध्द आहे. त्यामुळे तिच्या वेगवेगळ्या परदेशी दौर्यां बद्दल ती मला कायम सांगत असते. बरेच दिवस बोलणं नाही झालं तर काळजीने विचारपूस करते. मागच्या वर्षी तिने माझी दोन स्केचेस काढून मला आश्चर्याचा धक्का दिला. या माझ्या चित्रासाठी तिने माझ्या अनेक फोटोंचा अभ्यास केला होता. मागील वर्षी रशिया युक्रेन युध्दात क्रिमिया हा युक्रेनचा प्रांत रशियाने गिळंकृत केल्या नंतर आमची बऱ्याच वेळा राजकीय गोष्टींवर चर्चा होत असे. युक्रेन हा देश आपल्याला फारसा माहीत नाही कारण हा देश रशियाच्या विघटना नंतर तयार झाला.

युक्रेन मधील घरे ,त्यांची खाणपान पध्दत ,त्यांची भव्य चर्चेस आणि सिनेगॉनन्स त्यातील संगीत नाटकांचे कार्यक्रम यांचा मी बऱ्याच वेळा हेलनमुळे व्हिडीओ द्वारा अनुभव घेतला. तिचा नवरा नुकताच व्यापारी जहाजाने मुंबईला येण्यासाठी निघणार आहे तेव्हा कदाचित आमची भेट होण्याची शक्यता आहे. एका मोठ्या मैत्रीणी प्रमाणे हेलनला माझी कायम काळजी वाटत असते, ती बऱ्याच वेळा आई प्रमाणे सल्ले देते. तिला लवकरच भारत आणि श्रीलंका फिरायचा आहे. हा माझ्या सातासमुद्रा पल्याड राहणाऱ्या एका मैत्रिचा अनुभव खरंच खुप छान होता. गेली चार वर्षे आम्ही सतत संपर्कात आहोत आणि पुढेही ही मैत्री अशीच छान राहील यात शंका नाही…

– प्रणव पाटील


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)