साताऱ्यापेक्षा गावातील रस्ते बरे

ग्रेड सेप्रेटरजवळील रस्ते खड्ड्यात : वाहन चालकांचे मोडतंय कंबरडे

दीपक देशमुख

सातारा – पोवईनाक्‍यावर ग्रेड सेप्रेटरजवळील सर्वच रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यांचे खोदकाम सुरू असल्याने रस्ते अगोदरच अरुंद झाले आहेत, त्या उरलेल्या रस्त्यांवरही खड्डे पडल्याने वाहनचालकांची जीवघेणी कसरत सुरू आहे. तीव्र उतारांवर खड्डे चुकतवाना लोकांची कंबरडे मोडू लागली आहेत. जिल्ह्याचे ठिकाण सातारापेक्षा गावाकडील रस्तेही अधिक चांगले असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत.

साताऱ्यातील पोवई नाक्‍यावर मोठा गाजावाजा करत ग्रेड सेप्रेटरचे काम सुरू झाले. त्यानंतर या परिसरातील सर्वच रस्त्यांवर खोदकाम सुरू झाले. तत्पूर्वी शहरातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली होती. त्यातच अत्यंत रहदारीचा असलेल्या पोवई नाक्‍यावरही ग्रेड सेप्रेटरच्या कामामुळे रस्ते अरुंद होवू लागले. रस्त्यांचे खोदकाम, कामासाठी होणारी अवजड वाहतूक यामुळे येथील रस्त्यांवरही मोठमोठे खड्डे पडू लागले आहेत. मरिआई कॉम्प्लेक्‍सपासून रयत संस्थेकडे जाणारा रस्ता तीव्र उताराचा आहे.

सध्या याठिकाणी वाहतूक सुरू ठेवण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. मात्र, रस्त्यावर खड्डे असल्याने चालकांची तारांबळ उडत आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तहसील कार्यालयाकडे जाणारा मार्गही अत्यंत चिंचोळा झाला आहे. याठिकाणीही मोठी रहदारी असते. खड्डे चुकवण्याच्या नादात वाहने अनेकदा विरुद्ध दिशेला जात असतात. त्यामुळे अपघाताचा धोका वाढत आहे. ग्रेड सेप्रेटसाठी खोलवर खोदकाम झाले आहे. त्याकडेला रस्त्यावरील वाहन चालकांचा त्यात तोल नये, यासाठी भक्कम संरक्षक जाळी अथवा कुंपण उभारण्याची गरज आहे.

 

पोवई नाका परिसरात रस्त्यांवर ग्रेड सेप्रेटरच्या कामामुळे खड्डे पडले असून रस्त्यांची डागडुजी करण्याबाबतच्या सूचना संबंधित टीएनटी कंपनीच्या ठेकदारांना नुकत्याच दिलेल्या आहेत. रस्त्याच्या ुडागडुजीला लवकरात लवकर सुरुवात होईल.
– मनोज शेंडे
  बांधकाम सभापती, सातारा नगरपालिका


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)