साताऱ्यात 25 जानेवारीला वंचित आघाडीची सभा

ऍड. प्रकाश आंबेडकर, खा. ओवेसींची उपस्थिती

सातारा – आगामी निवडणुकीत कॉंग्रेस व भाजप व्यतिरिक्त तिसरा पर्याय म्हणून स्थापन करण्यात आलेल्या वंचित बहुजन आघाडीची दि.25 जानेवारी रोजी साताऱ्यात सभा होणार आहे. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड.प्रकाश आंबेडकर यांच्यासह एमआयएम पक्षाचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
आगामी लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील 12 जागा लढविण्याची घोषणा या अगोदरच आघाडीच्यावतीने करण्यात आली होती. त्यानंतर औरंगाबाद व सोलापूर येथे झालेल्या सभेस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर आता येत्या 25 जानेवारीला साताऱ्यात सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील राजकारण व समाजकारण ढवळून निघणार आहे. विशेषत: एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी प्रथमच साताऱ्यात येणार असल्यामुळे ते काय बोलणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे. त्याचबरोबर सभेसाठी आ.इम्तियाज जलील, ओबीसी नेते शंकरराव लिंगे, माजी आमदार विजयराव मोरे, पद्मश्री लक्ष्मण माने, गणपत भिसे, नाथन केंगार, शिवानंद हैबतपुरे हे देखील उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)