साताऱ्यात 19 रोजी महिला लोकशाही दिन

सातारा – जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सोमवार, 19 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती आर. एस. ढवळे यांनी दिली.

महिला लोकशाही दिनामध्ये अर्ज करणाऱ्या महिलांनी प्रथमत: तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनामध्ये संबंधित तालुक्‍यातील तहसिलदार तथा अध्यक्ष किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी तथा सदस्य सचिव यांच्याकडे विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्‍यक आहे. तेथे तक्रारीचे निराकरण न झाल्यास जिल्हास्तरावरील महिला लोकशाही दिनामध्ये तक्रार अर्ज करवयाचा आहे.

-Ads-

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाकरिता करावयाचे विहीत नमुन्यातील अर्ज संबंधितांनी द्विप्रतीत करणे आवश्‍यक आहे. तक्रार अर्ज, निवेदन हे वैयक्तिक स्वरुपाचे असणे आवश्‍यक आहे. अर्जदार महिलांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्‍यक त्या कागदपत्रासह जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पाठविणे आवश्‍यक आहे. त्यानंतर येणाऱ्या महिला लोकशाही दिनादिवशी मुळ अर्ज व अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रासह महिला लोकशाही दिनास उपस्थित राहणे आवश्‍यक असल्याचेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ढवळे यांनी कळविले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)