साताऱ्यात हॉटेल चालकाला मारहाण

सातारा,दि.8 (प्रतिनिधी) – सातारा शहरातील एका हॉटेल चालकाला मारहाण झाली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात सहाजणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अभिजीत चंद्रकांत राजेमहाडीक (रा. माची पेठ,सातारा) साईनाथ संभाजी पवार (रा. मंगळवार पेठ,सातारा)बापू बबन सकटे ( रा. जकातवाडी) शांताराम कोंडीबा खरात (रा.माची पेठ,सातारा)आनंदा संभाजी सकटे ( रा. जाकतवाडी) अक्षय पांडूरंग जगताप (रा. माची पेठ,सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
संशयीतांनी फिर्यादीच्या हॉटेलमधून दारू पिण्यासाठी ग्लास घेतले होते. त्यानंतर ते परत केले नाहीत. त्यामुळे फिर्यादीने ग्लास परत मागितल्याच्या रागातून संशयितांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीचे काका व इतर नातेवाईकांना घरात घुसून मारहाण केली, असे वैभव वसंत परदेशी (रा. बुधवार पेठ, सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तपास पोलिस हवालदार जगदाळे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)