साताऱ्यात स्वाईन फ्ल्यूचा तिसरा बळी

वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप
सातारा ता. 9 (प्रतिनिधी) – मल्हार पेठेतील रिक्षा चालक आणि विरशैव कक्कया समाजाचा सक्रिय कार्यकर्ता असलेल्या महेंद्र तपासे (वय-38) याला शनिवारी पहाटे सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, स्वाईन फ्ल्यू सारख्या आजाराची लक्षणे असताना सहा तास उपचार न मिळाल्यामुळे पुण्याला नेण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला. साताऱ्यात स्वाईन फ्ल्यूचा हा तिसरा बळी आहे.
सिव्हील हॉस्पिटल, पोलीस आणि नातेवाईक यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र तपासे हा युवक रिक्षा चालक असून गेल्या आठ दिवसांपासून तो ताप आल्याने आजारी होता. शनिवार ता. 8 रोजी छातीत दुखत असल्याने त्याला सिव्हील हॉस्पिटलमध्ये पहाटे 4 वाजता दाखल करण्यात आले. मात्र, स्वाईन फ्ल्यूची लक्षणे असूनही सकाळी 11 वाजेपर्यंत उपचार न मिळाल्याने एका खाजगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. परिस्थिती अधिक बिकट झाल्याने पेशंटला पुण्याला नेण्यास सांगण्यात आले.खाजगी रुग्णवाहिकेतून पेशंटला पुणे येथील ससून रुग्णालयात नेण्यात आले. सिव्हीलची रुग्णवाहिका बाहेर दिली जात नाही, असे त्यावेळी सांगण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. शनिवारी दु. 3 वा. महेंद्रला पुण्याला नेण्यात आले. मात्र, 5 वा. महेंद्र मयत असल्याचे ससून येथील डॉक्‍टरांनी सांगितले.
दरम्यान मयत महेंद्रच्या मृतदेहावर पुण्यात कसलीच कारवाई न झाल्याने शनिवारी रात्री उशिरा सिव्हीलमध्ये शवविच्छेदन करण्यात आले. यासाठी डॉक्‍टर असताना कर्मचारी उपलब्ध नसल्याने शवविच्छेदनाला दोन तास उशीर झाला. रात्री उशिरा शवविच्छेदन करून बॉडी ताब्यात देण्यात आली आणि तद्‌नंतर मयतावर माहुलीत अंत्यसंस्कार झाले.
स्वाईन फ्ल्यूसारखा पेशंट सिव्हीलमध्ये दाखल झाला असताना स्वॅप काढला जात नाही आणि बॉडी आल्यानंतर मरणोपरांत प्रक्रिया केली जाते. म्हणजेच आरोग्य व्यवस्था व्हेंटिलीटरवर असून या व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे उघड होत आहे. वेळेत उपचार मिळाले असते तर जीव वाचला असता, असा आरोप महेंद्रच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र, मेल्यानंतरही न्याय मिळत नसल्याने बॉडी सिव्हीलच्या आवारात असताना चार तास पीएम आणि प्रक्रिया करण्यासाठी लागतात, हे वेदनादायी असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

उपचाराभावी पाच तास…
सिव्हीलमध्ये ऍडमिट केल्यानंतर पाच तास उपचार सुरू न झाल्याने नातेवाईकांची तगमग होत असताना स्वाईन फ्ल्यूचा स्वॅपही घेण्याची तसदी डॉक्‍टरांनी घेतली नाही. अखेर पुण्यातून बॉडी सिव्हीलमध्ये आणल्यानंतर स्वॅप घेण्यात आला.मयत महेंद्रची बॉडी सिव्हीलमध्ये आणल्यानंतर चार तास पीएम करण्यासाठी घालवण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)