साताऱ्यात स्वाईन फ्लूने घेतला एकाचा बळी

सातारा- जिल्ह्यात चिकूण गुणीयाच्या साथीने जोर धरला असतानाच स्वाईन फ्लूने साताऱ्यात सोमवारी एकाचा बळी घेतला. आनंदा ज्ञानु इंगळे रा. सैदापूर, ता. सातारा यांचा जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वाईन फ्लूचा उपचार सूरू असताना मृत्यू झाला. यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली असून पुन्हा स्वाईन फ्लूने डोके वर काढल्याची भिती निर्माण झाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आनंदा इंगळे हे काही दिवसांपूर्वी आजारी पडले होते. त्यामुळे त्यांना 31 ऑगस्ट रोजी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल होते. इंगळे यांच्यावर उपचार केले असता नेमके निदान समजून येत नसल्याने, त्यांना रविवारी रात्री त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.मात्र सोमवारी सकाळी त्यांचे निधन झाले. रूग्णालयात केलेल्या विविध तपासण्यानंतर इंगळे यांना स्वाईन फ्लू झाल्याचे वैद्यकीय सुत्रांनी नमुद केले.

स्वाईनफ्लुच्या रुग्णांवर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची बोलले जाते. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, डॉक्‍टरांचा सल्ला वेळीच घ्यावा असे अवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)