साताऱ्यात सापडलेले सहा हजार केले परत

विध्यार्थ्यांचा प्रामाणीकपणा; पोलिसांनी केला सत्कार

एटीएममध्ये सापडलेले सहा हजार रुपये विद्यार्थ्यांनी प्रामाणीपणे पोलिसांच्या हवाली केले. साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज समोरील एटीएमध्ये पैसे सापडले होते .

-Ads-

याबाबत अधिक माहिती अशी की, विकास गुलाब रूपनवर रा. फडतरी ता. माळशिरस, वैशाली सत्यवान निकम रा. करंदी ता. जावली, पल्लवी बाळासो जाधव रा. कवठे ता. सातारा हे विद्यार्थी राज्यसेवेचा अभ्यास करण्यासाठी साताऱ्यात आहेत.

गुरूवारी हे सर्वजण एका बॅंकेच्या एटीएमला गेले होते. त्यावेळी एटीएममध्ये गेलेल्या वैशाली यांना पैसे पडल्याचे दिसून आले. त्यांनी याची माहिती त्यांच्या मित्रांना दिली.

त्यानंतर त्यांनी आत जात पैसे ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले पैसे या विद्यार्थ्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात जमा केले. यावेळी पोलिस ठाण्यात उपस्थित पो.उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)