साताऱ्यात संविधान दिन उत्साहात साजरा

सातारा, दि. 28 (प्रतिनिधी)- सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाच्यावतीने संविधान सप्ताहाचे उद्‌घाटन साताऱ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी राज्यघटनेच्या सरनाम्याचे सामुहिक वाचन करण्यात आले. विविध पक्ष संघटनांच्या सरनाम्याच्या प्रतीचे वाटप करण्यात आले. यावेळी जात पडताळणी समिती सातारा येथील सहाय्यक आयुक्‍त रविंद्र कदम, प्रदिप आचार्य, कर्मचारी समाज कल्याण सहाय्यक आयुक्‍त कार्यालयातील अधिकारी सुनिल घारे, मिलिंद गमरे, प्रशांत हेळकर, सर्व कर्मचारी वर्ग समतादूत प्रकल्प अधिकारी दिलीप वसावे, राहूल गंगावणे, हेमंत चव्हाण, महेश घाडगे आदी उपस्थित होते. संविधान सप्ताहामध्ये समतादूतांच्या माध्यमातून तालुका पातळीवर तसेच जिल्हा पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे दिलीप वसावे यांनी यावेळी सांगितले. यानंतर बार्टीच्यावतीने विविध शासकीय कार्यालय, महाविद्यालयांमध्ये संविधानाच्या प्रतींचे वाटप करण्यात आले. सातारा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांना भारतीय संविधानाची प्रत भेट देण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)