साताऱ्यात संगीत मैफल

पंडित वसंतराव घोरपडकर गुरुजींच्या स्मृतीप्रित्यर्थ

सातारा – जागतिक किर्तीचे पखवाज वादक, मृदंगाचार्य कै. पंडित वसंतराव घोरपडकर गुरुजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ शनिवारी सातारा येथे संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कलावंत शास्त्रीय संगीताची अदाकारी सादर करणार आहेत.

-Ads-

या कार्यक्रमात पंडित डालचंद शर्मा (दिल्ली) हे ‘पखवाज एकलवादन’ सादर करणार असून पंडित दत्तात्रय भावे (पुणे) यांचे “तबला एकलवादन’ सादर होणार आहे. सुप्रसिद्ध संवादिनी वादक मिलिंद कुलकर्णी (पुणे) हे त्यांना संवादिनीची साथसंगत करणार आहेत. तसेच यावेळी प्रसिद्ध गायक ईश्‍वर घोरपडे (पुणे) यांचे “खयाल गायन’ होणार असून त्यांना अमोल माळी तबल्याची व श्रीमती आदिती गराडे हार्मोनियमची साथसंगत करणार आहेत. श्रावस्ती सांस्कृतिक केंद्र करंजे (महानुभव मठा शेजारी), सातारा येथे शनिवारी सायंकाळी 5 ते 8 या वेळेत हा संगीत समारोह होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)