साताऱ्यात श्रावणसरींनी केला पर्यटकांचा आनंद व्दीगुणीत 

सातारा- गेल्या काही दिवसां पासून हलक्‍या सरिंनी सातारकरांना चिंब करणाऱ्या पावसाने श्रावणाच्या पहिल्या दिवसा पासून दमदार हजेरी दिली. क्षणात फिरुन येणाऱ्या पावसाच्या सरी सातारकरांना चिंब भिजवत असताना सूर्याने मात्र अजिबात दर्शन दिले नाही. श्रावण सरींनी सुट्टी साजरी करणाऱ्या पर्यटकांचा आनंद व्दीगुणीत केला.

रविवारी सकाळपासूनच पावसाच्या हलक्‍या सरी कोसळण्यास सुरूवात झाली होती तर दुपारी व सायंकाळी पावसाचा जोर अधून, मधून वाढत होता. त्यामुळे शहर व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले . तसेच सुट्टीचा वार असल्याने पावसाचा आनंद लुटण्यासाठी अजिंक्‍यतारा किल्ला, कास, यवतेश्‍वर व ठोसेघेरकडे जाणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत होते. दुसऱ्या बाजूला मात्र शहरात खड्डयांची संख्या वाढल्याने खड्डयांमध्ये पाण्याची डबकी साचल्याने पादचारी व दुचाकीचालकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे देखील दिसत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)