साताऱ्यात शनिवारी संदीप खरे यांचा कार्यक्रम

सातारा – प्रसिध्द मराठी कवी व गायक संदीप खरे हे शनिवार, दि. 6 ऑक्‍टोबर रोजी शाहू कला मंदिर, सातारा येथे सायंकाळी 6 वाजता “मी अन्‌ माझा आवाज’ या कार्यक्रमाव्दारे सातारकरांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात मनमोकळया गप्पा आणि त्यांच्या कवितांचे सादरीकरण होणार आहे.

संदीप खरे हे नावाजलेले गीतकार आणि कवी आहेत. त्यांचे “दिवस असे की’ आणि “आयुष्यावर बोलू काही’ हे गीतसंग्रह विशेष प्रसिध्द आहेत. “आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमांचे एक हजारच्यावर प्रयोग झाले आहेत. नुकतेच कवी संदीप खरे ह्यांचे “मी अन्‌ माझा आवाज’ हे कवितेचे पुस्तक प्रकाशित केले आहे.

शनिवारी होणाऱ्या कार्यक्रमात संदीप खरे हे या पुस्तकांतील कवितांचे सादरीकरण करणार आहेत . सातारकरांना मोफत ऐकता यावा यासाठी जनता सहकारी बॅंकेने विशेष पुढाकार घेतलेला आहे. या कार्यक्रमास सर्व सातारकर रसिकांनी आर्वजून उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक जनता सहकारी बॅंकेचे चेअरमन अतुल जाधव तसेच मसाप शाहुपूरी शाखेच्या वतिने करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)