साताऱ्यात व्यावसायिकाला लुटले

रोख रकमेसह दुचाकी पळवली; पोवई नाक्‍यावरील थरार

सातारा,दि.20 (प्रतिनिधी) – दिवसभराची कमाई घेऊन निघालेल्या व्यावसायिकाला चोरट्यांनी लुटल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी रोख रकमेसह व्यवसायिकाची दुचाकीही लांबवली. याप्रकरणी किशोर विलास पवार ( रा. करंजे,सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार यांचा मोबाइल विक्रीचा व्यवसाय आहे. किशोर पवार दि. 19 रोजी दुकानातील दिवसभरातील कमाईचे रोख पाच हजार रुपये घेऊन घराकडे निघाले असताना, पोवईनाक्‍यावर अज्ञात दोघांनी त्यांना थांबवले त्यानंतर जबरदस्तीने पवार यांच्या खिशातील मोबाईल, रोख रक्कम पाच हजार रुपये व त्यांची दुचाकी घेऊन चोरटे पसार झाले. घटनेची माहिती मिळताच साताऱ्याचे उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या . पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन मच्छले करत आहेत . पोवई नाक्‍या सारख्या गजबजलेल्या ठिकाणी लुटची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)