साताऱ्यात विविध रोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सातारा ः फित कापून शिबिराचे उद्‌घाटन करताना डॉ. अशोक गोंधळेकर, डॉ. श्रीकांत कारखानीस शेजारी उपस्थित मान्यवर.

सातारा, दि. 2 (प्रतिनिधी) – इनरव्हील क्‍लब ऑफ सातारा कॅम्पने आयोजित केलेल्या मोफत विविध रोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये अस्थीरोग, त्वचारोग, हृदयरोग, बालरोग, दंतरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग, सर्जरी याचे 400 रुग्ण तपासण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन सातारचे ज्येष्ठ शल्यचिकिच्छक डॉ. अशोक गोंधळेकर यांच्या हस्ते व सातारा तालुक्‍याचे आरोग्याधिकारी डॉ. श्रीकांत कारखानीस यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी डॉ. गोंधळेकर म्हणाले, गरजू रुग्णांसाठी अशा प्रकारचे मोफत शिबिर आयोजित करण्याचा इनरव्हिल क्‍लबचा उपक्रम कौतुकास्पद आहे. या शिबिराचा सर्व रुग्णांनी लाभ घ्यावा. डॉ. कारखानीस यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले व शिबिराला मार्गदर्शन केले.
इनरव्हील क्‍लबच्या अध्यक्षा सौ. निना महाजन म्हणाल्या गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराच्या माध्यमातुन मदत करण्यामध्ये सात्विक आनंद मिळतो व इनरव्हील क्‍लब यामध्ये नेहमीच अग्रेसर असते. यापुढेही अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन भविष्यात आम्ही करणार आहोत. या शिबिरामध्ये मोफत तपासणी बरोबरच X Ray, रक्त तपासण्या, शस्त्रक्रिया यामध्ये 50% सवलत मिळणार आहे.
शिबिरासाठी सातारा येथील अति उच्चशिक्षित तज्ञ डॉ. स्वेच्छेने सहभागी झाले. ज्या समाजाचा आपण एक घटक आहोत, त्या समाजातील गरजू रुग्णांचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने प्रेरित झालेल्या अस्थीरोगतज्ञ डॉ. अभिषेक महाजन, शल्यचिकित्सक डॉ. चैतन्य बोकिल, त्वचारोगतज्ञ डॉ. आदित्य महाजन, हृदयरोगतज्ञ डॉ. विक्रांत महाजनी, बालरोगतज्ञ डॉ. नितीन ओंबासे, नेत्ररोगतज्ञ डॉ. गौरव पोटनीस, स्त्रीरोगतज्ञ डॉ. स्नेहल जगताप, दंतरोगतज्ञ डॉ. स्नेहल ओंबासे, भुलतज्ञ डॉ. मुग्धा महाजन व डॉ. तन्वी महाजन यांचे विशेष सहकार्य लाभले.
अशा प्रकारचे मोफत विविध रोग निदान शिबिर इनरव्हील क्‍लब सातारा कॅम्पतर्फे पहिल्यांदाच होत आहे. इनरव्हील क्‍लब सातारा कॅम्पच्यावतीने सचिव रेणु येळगावकर, उपाध्यक्ष लिना कदम, वैशाली पाटील, संगीता झंवर, अपर्णा गांधी, अंजली देशपांडे, डॉ. निलोफर, सीमा मुथा, मिनाझ मुलानी यांनी शिबिरामध्ये उपस्थित राहुन रुग्णांना मार्गदर्शन केले.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)